बीज/Bij Kavita
इथं काय रुजतं?
मातीखाली निजतं
पाण्याने निजतं,
इथं आहे इवलं
सुरेखसं बीज!
एवढासा कोंब
हळूच येईल वर,
सूर्य म्हणेल त्याला
माझा हात धर.
अंगाई गाणं
वारा गाईल त्याला,
झुलता झुलता
पानं येतील त्याला
इवल्याश्या रोपाचं
झाड होईल छाि,
फुला- फळांनी
बहरेल रान.
-सुशील पगारिया