Amche Darashi Hai Shimga Lyrics-Yogesh agravkar

Amche Darashi Hai Shimga Lyrics in Marathi

नारळान पाणी नाव देवाचं घ्या
नारळान पाणी नाव देवाचं घ्या
नारळान पाणी नाव देवाचं घ्या
नारळान पाणी नाव देवाचं घ्या

येताले देवा तुला मी पाहिलंय
खंदेरी डोंगर मानावीला
येताले देवा तुला मी पाहिलंय
खंदेरी डोंगर मानावीला

नारळान पाणी नाव देवाचं घ्या
नारळान पाणी नाव देवाचं घ्या

एक नारळ दिलाय दर्या देवाला
अरे एक नारळ दिलाय दर्या देवाला
अन वरसाचा मन देव नारळी पुनवेला
अरे वरसाचा मन देव नारळी पुनवेला
सोन्याचा नारळ वाहुनशी तुला
खंदेरी डोंगर मानावीला
येताले देवा तुला मी पाहिलंय
खंदेरी डोंगर मानावीला

नारळान पाणी नाव देवाचं घ्या
नारळान पाणी नाव देवाचं घ्या
नारळान पाणी नाव देवाचं घ्या
नारळान पाणी नाव देवाचं घ्या

आमचे दाराशी हाय शिमगा
आमचे दाराशी हाय शिमगा
बारा महिन्याचे पंधरा दिसाचा
खेळतो ह्यो शिमगा
आमचे दाराशी हाय शिमगा
आमचे दाराशी हाय शिमगा
सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावानं
आमचे दाराशी हाय शिमगा
आमचे दाराशी हाय शिमगा

आर माझ्या होळीच्या पाटला
बसलास कनचे बाजूला
घरान बसूनशी का रे करतस
हान मना राशी बेवरा
आमचे दाराशी हाय शिमगा
आमचे दाराशी हाय शिमगा

होरीवर नाकवा कोण नाकवा रे
होरीवर नाकवा कोण नाकवा रे
होरीवर नाकवा कोण किसन नाकवा रे
होरीवर नाकवा कोण किसन नाकवा रे

न सोर माल्या बैल जाऊदे
राटाची र पान्याला
तेच पानी जाऊदे आमचे
हौलय बाईचे पूजेला

रामाचं ध्यान गेलं शीतेवरी
शीतेचं ध्यान गेलं रामावरी
रामाचं शत्रू रावण
त्यानं शितेला नेली पळवून
रामाचं हनुमान बली र
त्यानं लंकेची केली होळी र

जोय जाय जोय जाय
जोय जाय जोय जाय जोय जाय
जोय जाय जोय जाय
जोय जाय जोय जाय जोय जाय
जोय जाय जोय जाय

लारान डुलतय हौलबाय
जोय जाय जोय जाय
लाराची डुल माझी हौलबाय
जोय जाय जोय जाय
जोय जाय जोय जाय जोय जाय

Leave a Comment

close