Chaitya Mahinyache Lyrics – Aai Mauli Koligeet Song

Chaitya Mahinyache Lyrics

Song : Aai Mauli
Singer : Sonali Sonawane, Kabeer Shakya, Prashant Nakti and Pranay Bansode
Lyrics : Prashant Nakti
Music : Kabeer Shakya
Music On Prashant Nakti Official

चैता महिन्याचे सनाला उरुस भरलाय कार्ल्याला,
आईचा बोलवानु आयलाय गो नाखवा निंघतय जत्रला

एकविरा आई गो एकविरा आई-२
माथ्यावर तुझीच सावली
माझी एकविरा माऊली ।।ध्रु।।

वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव..

आई तुझे कुशीन गो घे तु माये लेकराला,
दुरुनशी आयलाय भगत तुझा भक्तीन माउले सेवेला..
आई तुझे चरनाशी स्वर्गाचा हाय नजराना,
सोन्याचे पाऊली कार्ल्याचे राऊळी, आई माझी सजली पालखीला..
सपनान येउन आई माऊली बोलवतय मना कार्ल्याला
मानाची ओठी घेऊनशी ये तु माझे भेटीला

एकविरा आई गो एकविरा आई-२
माथ्यावं तुझीच सावली
माझी एकविरा माऊली ।।१।।

येई हो एकविरा माझे माऊली ये

माऊले…

आई भंडारा कपाळी लावुन
माझे मुखान नाव तुझं घेउन
आज नाचत गाजत निंघाली सारी
माऊले तुझ्याच पालखीला
सारे दुख मी जातो गं इसरुन
माऊले तुझ्याच पायाशी येऊन
तुझा मायेचा पाझर भक्तीचा सागर
येर लावतय माझे कालजाला

तुझा सजलाय छबीना मानाचा
शिरावर हात तुझ्या किरपेचा
मलवट गुल्लालानु भरलय
धुकं दाटलय भगव्या रंगाचा

एकविरा आई गो एकविरा आई-२
माथ्यावं तुझीच सावली
माझी एकविरा माऊली ।।२।।

Also See: Aale Re Ganpati Aaj Dari Re Lyrics Marathi

1 thought on “Chaitya Mahinyache Lyrics – Aai Mauli Koligeet Song”

  1. Pingback: Aai Mauli Mazi Disu De Lyrics - Preet Bandre Avtan | PlayLyric.com

Leave a Comment

close