Movie – Baba
Singer – Abhay Jodhpurkar
Music – Rohan Rohan
Lyricist – Mangesh Kangane
Music on Zee Music Company
Haluvar Haak Tu Lyrics in Marathi
हळुवार हाक तू
पापणीची जाग तू
उसवून नाते असे
जाऊ नको दूर
उरातली ओढ तू
मनातले वेड तू
आठवणी तुझ्या देती
नवी हुरहूर
ना कुणीही तुझ्यासारखे
का मनाला सारे पोरके
अवती भवती रिते रिते जग हे
हळुवार हाक तू
पापणीची जाग तू
उसवून नाते असे
जाऊ नको दूर
दाखवीत चांद कोन
भरवील घास
भास उरतील माझ्या
परी मुके
दुरावेळ हसू रोज
धावतील आसू
सांग शोधू तुला
दिन रात मी कुठे
सुखाचे रे नाव तू
ओळखीचे गाव तू
नकळत जाई वाट
तुझ्याकडे
उजेडाचे रोप तू
चांदण्याचे गोप तू
उजळून जाई जग
सुने सुने
ना कुणीही तुझ्यासारखे
का मनाला सारे पोरके
आवती भावती रिते रिते जग हे
हळुवार हाक तू
पापणीची जाग तू
उसवून नाते असे
जाऊ नको दूर
उरातली ओढ तू
मनातले वेड तू
आठवणी तुझ्या देती
नवी हुरहूर