Hey Bappa! Gaon Ganpati Song Lyrics

Hey Bappa! Gaon Ganpati Song Lyrics

ढम्माक ढोल वाजतोय ढाय ढाय
तालात नाचू दम दम थाय
झाला गाजा वाजा रे
नमू बाप्पाला सारे

हे बाप्पा हे बाप्पा हे बाप्पा हे बाप्पा बाप्पा

गजानना तुझ्याविना
करमत नाही तुझ्याविना

Rap
झगमगते पितांबर शम्भूसुता तू सुंदर
आतुरलो दर्शनास धाव घे रे विश्वम्भर
रिद्धी-सिद्धीपती तू देवा श्री गजपती तू
महाकाय वक्रतुंड तूच धरा तू अंबर
आसमंती घुमला तो नाद एक मोरया
मंगलमय गणराया बाप्पा तु मोरया
जाळ तुझ्या नजरेने पाश आमचे मोरया
मंगलमय गणराया बाप्पा तू…. मोरया

भरली चिंगारी नजरेत आमुच्या
तुझे दर्शन धेता
फुटला डोंगर हा संकटाचा
नाम तुझे हे घेता

दमक दमक बिजली कशी ही तळतळली
आली नवी उमंग नवी हवा
चमक नवी उरा मध्ये जी चमचमली
मिळे उभारी अन जोश नवा

घुमतो आकाशी
नाद एक मोरया
आला रे आला मोरया
झाला तुझा बोलबाला
दाही दिशा मोरया
आला रे आला तू मोरया

साऱ्यांच्या मनात तूच भिनलाय
देवा तुझ्या प्रेमाला तोडच नई
देवा आम्हा तू पाव रे
गना हाकेला धाव रे

गणा धाव रे मना पाव रे
तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे
तू दर्शन अम्हांला दाव रे

Leave a Comment

close