Isaq zala ra is new song romatic song sung by Priyanka Barve & Sujit Daki starring Vishal Phale and Sampurna Sarkar and music and lyrics given by Sujit and Viraj .
Isaq Jhala Ra Song
Song Details :
Song : Isaq Zala Re Singers : Priyanka Barve & Sujit Daki
Music & Lyrics : Sujit – Viraj
Starring : Vishal Phale & Sampurna Sarkar
Project Managed By : Prashant Nakti
Music Label : Ace Production
Isaq Zala Ra New Song Lyrics
भिजल रान
फुल पान पावसात न्हाल
अत्तर सांडलं वाऱ्यामंदी घुसळल
पिसाटल येड मन मधात बुडाल
पिसाटल येड मन मधात बुडाल
इसक झालं र गड्या
इसक झालं र
इसक झालं र गड्या
इसक झालं र
रात दिस देवा म्होर साकडं घातलं
तुटलेल्या ताऱ्याकडे तुला मागेल
स्वर्ग तुझ्या मिठीचा एकदा मिळुदे
पिरतीच्या वनव्याने पार जळूदे
ध्यास लागला जीव जडला
अंतरात खोल
नशा तरी अशी कशी
सावरना तोल
नजरेचा तिर आरपार हो घुसल
नजरेचा तिर आरपार हो घुसल
इसक झालं र गड्या
इसक झालं र
इसक झालं र गड्या
इसक झालं र
थर थर वठ हातावर टेकल
कट्यावर काटा शाहर्यानी घेरलं
धड धड छताडच ढोल बडलं
जागपनी सपान हे गोड पडलं
रंग चढता कातरला
भेटीची किनार
गोऱ्या मोहऱ्या गाला वर
लाजेचा मोहोर
सोन झालं जिंदगीच
सुख गवसलं
सोन झालं जिंदगीच
सुख गवसलं
इसक झालं र गड्या
इसक झालं र
इसक झालं र गड्या
इसक झालं र