Jeev Tujhyat Guntala Lyrics-Song City Marathi

  • Song-Jeev Tujhyat Guntala
  • Music Director-Raj Randive
  • Singer-Naveen More and Pradnya Abhange
  • Lyricists-Raj Randive
  • Music Lebel – Song City Marathi

Jeev Tujhyat Guntala Lyrics in Marathi

झुकली पापणी हि
बघ डाव्या डोळ्याची
तुझा हा भास झाला मनाला
तुझ्यासंग फिरे मन
आस आतुर होऊन
न्हते जशी कस्तुरी
कवळ्या उन्हाला

नजरेला धावली तू
मनाला भावली तू
जीव तुझ्यात गुंतला
ग साजणी
जीव तुझ्यात गुंतला
ग साजणी
जीव तुझ्यात गुंतला

डोळ्यातलं सपान
पापण्यात जपलं
म्हणावं प्रेमं
तू हि याला आपलं
एक आस मनाला
एवढीच हाय
सांगू कस अजून
मनी हाय काय

मेघ मनी दाटतया
वादळ भी उठतया
लागतीया हूर हूर
बाभड्या जीवाला
गडबड करतया
बडबड करतया
कस समजावू मी
वेड्या या मनाला

मनाची आस ग तू
प्रेमाचा भास ग तू
जीव तुझ्यात गुंतला
ग साजणी
जीव तुझ्यात गुंतला
ग साजणी
जीव तुझ्यात गुंतला

रात दिस विचार तुझा
मनी ह्या हाय ग
समजना उमजना
करू मी काय ग
खुला म्हण जग मला
याड तुझं हाय ग
कस समजावू मी याला
करू मी काय ग
मन माझं बावरलया
तूच याला सावरलया
ओरडून सांगीन मी
वेड्या या जगाला

तुझ्यासंग फिरे मन
आस आतुर होऊन
न्हते जशी कस्तुरी
कवळ्या उन्हाला

सजली ऱ्हास ग तू
जिव्हारी ध्यास ग तू
जीव तुझ्यात गुंतला
ग साजणी
जीव तुझ्यात गुंतला
ग साजणी
जीव तुझ्यात गुंतला

Leave a Comment

close