Lata Bhagwan Kare 2020 Full Movie Download

Movie Name : Lata Bhagwan Kare / लता भगवान करे

  • Cast – Lata Kare, Sunil Kare, Radha Chowan & Rekha Gaikwad
  • Production House – Parmjyothi Film Creations
  • Producer – Arrabhothu Krishna
  • Director – Naveen Deshabonia
  • Music on Zee Music Company

Movie Review / Lata Bhagwan Kare 2020 Full Movie Download

बुलढाणा जिल्ह्यातील  मेहकर नावाचा तालुका त्या तालुक्यात लता भगवान करे नावाची माउली आहे .साधारण ६५ वर्ष वय आहे तीच तीन मुली आणि ७० वर्षाचा तिचा नवरा गरिबीशी संसार करत सर्व व्यवस्थित चाललं होत . तीनहि मुलींची लग्न करून दिली  आयुष्यभर जेवढ काही कमावलेलं साठवलेलं ते मुळींच्या लग्नात घातलं ,आता दोघे नवरा बायको दुसऱ्याच्या शेतात रोजानी जायचे जो काही रोजगार हातावर पडायचा त्याच्यातुन आपली मीठ भाकरी खायचे .

आनंदात चाललं होत अगदी सर्व पण अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली . लता करेंना काय करावं कळेना , तिथल्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेली . सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी सांगितलं मोठ्या डॉक्टरांकडे  न्यायला लागेल ,काय करावं सुचेना चार जणांकडं शेजाऱ्या पाजाऱ्यांकडं पैसे गोळा केले ,नवऱ्याला सोबत घेतलं आणि बुलढाण्याकडे निघाली .

तिथं नवऱ्याला दवाखान्यात दाखवलं डॉक्टरांनी सांगितलं काही आणखी तपासण्या कराव्या लागतील पण त्याची सोय आमच्याकडे नाही ,तुमच्या नवऱ्याला घेऊन तुम्हाला बारामतीला जावं लागेल . आता मात्र लता करेंच्या पायाखालची जमीन सरकली अरे आता इथपर्यंत यायला चार जणांकडून पैसे घेऊन आलेलो .

आणि आता बारामतीला जायचं कस  तिथं आणि पैसे लागतील ,आणावं कुठून , करावं तरी काय ,अरे पोटाची खळगी कशीबशी भरतो आपण जगावं तरी कस कि आजारी माणसं सरळ मारून जावं जगूच नये .त्या माऊलीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले , करावं काय ज्या माणसानं आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, ज्या माणसानं आयुष्यभर स्वतःच्या खांद्यावर हा संसार  पेलून धरला ज्याने आयुष्यभर आम्हाला सुखाची सावली दिली , आज त्याच्यावर वेळ आली आणि आपण काहीही करू शकत नाही ,ती माउली आतल्याआत गलबलत राहिली ,करावं काय ? शेवटी  परत आली आणखी चार जणांपुढं शब्द टाकला .

मिळतील जुळतील तेवढे पैसे जमा केले नवऱ्याला सोबत घेतलं आणि बारामतीला पोहचली . डॉक्टरांच्या पुढं नवऱ्याला दाखवलं डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या आणि सांगितलं एक महत्वाची तपासणी करावी लागेल ,आता मात्र तिचा धीर खचला तपासण्या तरी किती करतात ,तीन डॉक्टरांना विचारलं ठीक आहे ,

पण खर्च किती येईल आणि डॉक्टरांनी जो खर्चाचा आकडा सांगितला तिच्या डोळ्यापुढं दिवसा अंधाऱ्या आल्या . अरे कस करावं तरी कस ? कुठून आणावा पैसे ? कि न्यावं सरळ नवऱ्याला मर म्हणुन सांगावं ! करावं काय काय ? आतल्या आत ढसढसत राहिली , बाहेर आली त्या बाकड्यावर बसली पदराला डोळे टिपत राहिली .कास करावं ?  काय काय सांगू नवऱ्याला ! जावं माघारी सरळ , मारू द्यावं नवऱ्याला असच, आतल्या आत हमसत राहिली .थोडा वेळ झाला .

डोळे पाणावलेले  कोरडे झाले , आणि त्याच बाकड्यावर पडलेला पेपर तिला दिसला . तो पेपर तीन वाचला मोठ्या ठळक अक्षरात लिहलेली बातमी तिच्या नजरेत भरली आणि ती चमकली  , बातमी होती बारामती मॅरेथॉनची ,आणि मॅरेथॉन मध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या बक्षिसाची त्या बक्षिसाच्या आकड्यावर तिची नजर स्थिरावली आणि तिच्या डोक्यात झणकंन कल्पना आली .

हे बक्षिस जर मी जिंकलं तर माझ्या नवऱ्याची तपासणी होऊन उपचार होईल , फक्त ६५ वर्षाची माउली तीन निर्णय घेतला नवऱ्याचा जीव  वाचवण्यासाठी ह्या बारामती मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा आणि ती ६५ वर्षाची माउली त्या मॅरेथॉनच्या इथं पोहचली,

सगळे  स्पोर्ट्सचे शुझ घालून आलेले ,t-शर्ट घातलेले ,रोज धावण्याचा सराव करणारे मॅरेथॉन स्पर्धेला , आणि त्यात हि आली होती ६५ वर्षाची “लता भगवान करे” नऊवारी नेसलेली ,कासोटा घातलेली ,अनवाणी पायाची संयोजकांना सांगतेय मला पण स्पर्धेत भाग घ्यायचाय ,मला पळू द्या चकित होऊन सर्व बघायला लागले ,ती सांगे लागली माझा नवरा दवाखान्यात हाय त्याला वाचवायचं असेल तर पळण्याशिवाय पर्याय नाही .मला कृपा करून पळू द्या . संयोजकांनी तिला भाग घेऊ दिला .आणि ६५ वर्षाची ती माउली त्या स्पर्धेला तयार झाली . बघता बघता पट्टी पडली आणि मॅरेथॉन चालू झाली आणि बेभाण बेभाण होती  लता भगवान  करे पळत राहिली .

रोजचे रोज सराव करणारे धाव पट्टू पळतायत अन त्यांच्याबरोबर पळतेय ती ६५ वर्षाची नऊवारी घातलेली ,कासोटा नेसलेली लता भगवान करे ,डोळ्यापुढं फक्त नवरा दिसतोय .त्याच्यासाठी पळायचंय, त्याला वाचवायचंय, त्याला जागवायचंय मला जिंकलंच पाहिजे ,जिंकलंच पाहिजे दुसरा पर्याय नाही .बेभाण बेभाण पळतेय , आतापर्यंत पळाली होती रानात जनावरांच्या मागं ,

आतापर्यंत पळाली होती संसाराला ठिगळ लावताना , आतापर्यंत पळाली होती संध्याकाळचे दोन घास कमावताना अशी मैदानावर कधी पळाली  नव्हती पण आयुष्य आता पळायला लावत होत बेभानपणे . पळत होती पळत होती आणि अखेर आवाज झाला स्पर्धा संपली आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेता ठरली हि ६५ वर्षाची ” लता भगवान करे ”

वय वर्ष ६५ नऊवारी नेसलेली , कासोटा घातलेली ,अनवाणी पायाची तिची यशोगाथा ह्या चित्रपटामध्ये दाखवली आहे.

More Read Lata Bhagwan Kare Movie Song Lyrics

Jayache Kshithija Lyrics Lata Bhagwan Kare

Neela Thujala lyrics-Lata Bhagwan Kare

Leave a Comment

close