Malhar Song, Singer, Cast, Movie, Actor and Actress

Malhar Song, Singer, Cast, Movie, Actor and Actress

Singer : Vishal Dadlani
Lyrics : Suraj – Dhiraj
Music : Suraj – Dhiraj
Recording, Mix & Arrangements : Yash Raj Studio
Cast: Bhau Kadam, Atul Parchure, Om Bhutkar, Kishore Kadam, Usha Naik
Director : Sumit Sanghamitra
Producer : Anjaneya Sathe

Song Lyrics:

मल्हार मल्हार मल्हार
मल्हार मल्हार मल्हार हो…

किरपेचा साज घुमतोया आज
रातीला जागर,
दुनियेचा साऱ्या केला उद्धार
देवा तू मल्हार,
पिरमाची आस लागली खास
उधळूया भंडार,
जगात माझ्या तुझ्याईन जीनं
झालया बेजारं,
भक्ताचा तू आधार
वैरीच्याचा तू काळ,
डमरू वाजे जाईजा
शंभूचा तू अवतार

मल्हार मल्हार मल्हार
मल्हार मल्हार मल्हार हो…

अलोया मी दारात
तुझ्या भक्तीच्या मी नादात
येडंपिसं मन झालया
तू दाखीव की रं वाट
दिमडी संबळ वाजे चाल
पुरता झालोया मी बेभान
ज्योत पेटली आभाळात
दूर लोटला हा अंधार
भक्ताचा तू आधार
वैरीच्याचा तू काळ,
डमरू वाजे जाईजा
शंभूचा तू अवतार

मल्हार मल्हार मल्हार
मल्हार मल्हार मल्हार हो…

आला भक्तजनांचा राज भारी
भंडारा शोभे छान
लावी मस्तकी भस्म तू ओंकारा
तुझी त्रिशूल डमरू शान
तुझ्या नजरेचा हा अंगार
केला दुष्टांचा तू संहार…
टाच मारून तू घोड्याला ,
हाती घेऊन तू तलवार…
भक्ताचा तू आधार
वैरीच्याचा तू काळ,
डमरू वाजे जाईजा
शंभूचा तू अवतार

मल्हार मल्हार मल्हार
मल्हार मल्हार मल्हार हो…

Leave a Comment

close