Man Chandan Zalaya Lyrics

Man Chandan Zalaya Lyrics

Singers – Prachi Sawant & Aniket Humbare
Music – Rushikesh More
Lyricist – Sagar Bhosale
Arrangers/Programmers – Salim Khan

मन चांदन झालया
ऊन कोवळ प्यालया

हो हो पाखरांना भूल घाली दिशा
मन पाखरू झालया
मन चांदण झालया

भास होतो तु दिसावी
सोबती तू माझ्या असावी

उजळूनी गेल्या दिशा ही
गूढ कळता तू नसावी
बावरे क्षण सारे माझ्या
उरात गोंदीन

चांदण्या तोडून गजरा
केसात माळीन
मन गजरा झालया
फुल प्रेमाचं आलया

हो हो पाखरांना भूल घाली दिशा
मन पाखरू झालया
मन चांदण झालया

सावल्या परतून आल्या
गंध ओल्या सरित न्हाल्या
बावऱ्या स्वप्नात माझ्या
येऊनी अंतरी मिळाल्या

हरवली छाया स्वतः मन उगाच भ्यालया
पांघराया लागलं नभ ढगाळलया

मन आभाळ झालंया
सरी उन्हाच्या प्यालया
हो हो पाखरांना भूल घाली दिशा

मन पाखरू झालया
मन पाखरू झालया
मन चांदण झालया

Leave a Comment

close