Nahi Kalale Kadhi Lyrics in Marathi

Nahi Kalale Kadhi Lyrics in Marathi

नाही कळले कधी जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
गोड हुरहूर ही श्वास गंधावला
ओळखू लागलो, तू मला मी तुला

तू मला, मी तुला, गुणगुणू लागलो
पांघरू लागलो, सावरू लागलो

तू कळी कोवळी, साजिरी गोजिरी
चिंब ओल्या सरी घेत अंगावरी
स्वप्न भासे खरे, स्पर्श होता खुळा
ओळखू लागलो, तू मला मी तुला

शब्द झाले मुके बोलती पैंजणे
उतरले गाली या सोवळे चांदणे
पाहताना तुला चंद्र ही लाजला
ओळखू लागलो तू मला मी तुला

4 thoughts on “Nahi Kalale Kadhi Lyrics in Marathi”

Leave a Comment