- Movie – Vegali vaat
- Singer – Dr Dinesh Arjuna
- Music – Dr Dinesh Arjuna
- Lyricist – Deepak Angewar
- Arrangers/Programmers – Dr Dinesh Arjuna
- Music Label – Zee Music Marathi
Pakhru Lyrics in Marathi
पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई
अंगणात चिव चिव व्हणारही नाही
काळीज हे फाटलं पर उसवाना पीळ
काळीज हे फाटलं पर उसवाना पीळ
तूझ्याइना जगण्याची होती ल्हाई ल्हाई
पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई
अंगणात चिव चिव व्हणारही नाही
तुझ्याच जीवाशी माझी जोडलेली नाळ
तूझ्याइना माझी कशी होणार सकाळ
नशीब तू माझं तूच आहेस कपाळ
उन्हात तान्हात माझ्या तुझाच आभाळ
कोमेजल रान सारी भेगाळल्या भुई
कोमेजल रान सारी भेगाळल्या भुई
रोज नस जिंदगीला जग कुठं नाही
पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई
अंगणात चिव चिव व्हणारही नाही
टोचता पायात काटा घोल बनलेलं
सुगंधात तुझ्या माझं जीन सजलेलं
हासण्यात तुझ्या होती सुगीची सराई
सुखापाई तुझ्या मी हे आयुष्य पेरलं
उगवता दिस कसा मावळून जाई
उगवता दिस कसा मावळून जाई
अंधारात उजेडाची वणवण होई
पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई
अंगणात चिव चिव व्हणारही नाही
तीळ तीळ तुटतोया श्वासाचा ह्यो धागा
खोलवर मनात ह्या पडलत भेगा
दूर दूर जातो माझ्या सुखाचा ह्यो धागा
उंबरठा फोडतोया जन्म माझा सारा
बोलवली दुःख किती एका सुखापायी
बोलवली दुःख किती एका सुखापायी
औषधाच्या बिमारीला दवापाणी नाही
पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई
अंगणात चिव चिव व्हणारही नाही
ओसाडल मन सून जीवाचं ह्यो रान
आसवात पावसाच्या आटलं सपान
जगण्यास देऊ आता कुठलं कारण
तुझ्याइन जीन असं रुसत मरण
जात्यात काळाच्या काळ भरडला जाई
जात्यात काळाच्या काळ भरडला जाई
जगण्याला जगण्याची शेरमही नाही
पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई
अंगणात चिव चिव व्हणारही नाही