Pori Sangtay Tula Khar Khar Lyrics
पोरी सांगतय तुला खरं खरं तुझ्याविना मला करमत नाय
तुझ्यासाठी मी रानी झालो दिवाना तुझ्याशी लगीन कराचं हाय
पोरी तुझे नादान झयलो दिवाना, बांधलाय येशीवं बंगला ह्यो
पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी, तुझ्यात जीव माझा रंगला गो
नाय मला गरज तुझ्या या पिरमाची
मी तुझ्या प्रेमाला भुलायची नाय
कनाला करतस दैना तु जिवाची
डोर आपले दोघांची जुलायची नाय
लाडाची लेक मी हाय कोलीवाड्याची
तुझ्या मी जाल्याला घावाची नाय
हैय्या हो हैय्या…हो हैय्या
थांब थांब थांब पोरी चाललीस कया बेगीन
पोरांच्या जीवाला लावुनशी घोर
होठावं लाली हाय डोल्यान सुरमा
तु दिसतस जनु चंद्राची कोर
Insta वर Follow केला Photo तुझा Like केला
Whatsapp वर Sad Status ठेवतय बघ ह्यो,
भाव तु खातस जाम Reply पन देत नाहीस
नाखवाला लागला तुझ्या प्रेमाचा रोग
लटक मटक चाल तुझी कालजावं घाव करी
तुझ्याविना नाखवा ह्यो राहील कसा
लेक हाय तु नाखवाची धडधड तु कालजाची
तुझे नादान झालाय ह्यो येरा पिसा
माझ्या ह्रदयाची काय सांगु दशा तुला माझे मनान काय घडतय
तुला बघुनशी रानी दिवाना झयलो कालीज धडधडतय
तुझ्या रुपाची चढली नशा मला माझं मन तुझ्या मागं पलतय
रोज रोज पोरी बंदरावरी मी तुझीच वाट बघतय
मना दौलत नको तुझी शोहरत नको
मना पोरा तुझी रं साथ हवी
सात जन्माची देईल साथ तुला
आधी लगीन कर तु माझ्याशी
माझा कालीज आज बघ भिडला
राजा तुझ्याच कालजाशी
बेगीन वाजत गाजत राजा
आन वरात दाराशी
Also See: Jambhul Ny Pikala Amba Lyrics