Shree Ganpati Stotra in Sanskrit & Marathi

श्री गणपती स्तोत्र( संस्कृत अनुवाद )

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्,
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ,
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च,
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्,
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:,
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्,
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्,
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत,
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||

श्री गणपती स्तोत्र ( मराठी अनुवाद )

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका,
भक्तीने स्मरता नित्य आयु: कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते,
तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्र ते ||२||

पाचवे श्रीलंबोदर, सहावे विकटनाव ते,
सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्ण ते ||३||

नववे श्रीभालचंद्र, दहावे श्रीविनायक ,
अकरावे गणपती, बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर,
विघ्नभिती नसे त्याला प्रभो! तू सर्व सिद्धिद ||५||

विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन,
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती ||६||

जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ,
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिध्दी न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे ,
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले ||८||

Leave a Comment