Soduni Tu Javu Nako Dur G Sajani Lyrics-Love Song

  • Singer : Shiva Mhatre 

Soduni Tu Javu Nako Dur G Sajani Lyrics in Marathi

Jiv Maza Tuzyat Guntala Lyrics in Marathi

जीव माझा तुझ्यात गुंतला
श्वास माझा अडखळला
येता शब्द तुझे जरासे
देह माझा डगमगला

आठवणीत तुझ्या ग राणी
पेटलं मन सार
सोडूनि तू जाऊ नको दूर सजनी
सोडूनि तू जाऊ नको दूर

स्मित हास्य आणले ओठी
जाणली माझी खोडी तू
बावरी तू राधा समझूनि
लावशी मज गोडी तू

मोहनांचा भावनांचा
नाही कसला भार
कशी जाऊ सोडून मी दूर , सजना
कशी जाऊ सोडून मी दूर

काय देऊ भेट तुला मी
ह्रिदय तुज पाशी अर्पिला
चांदण्यांची रिंग जोडी
हृदय त्या मधी ठेविला

या नयनाच्या कोपऱ्यात
अश्रुंचे हे पूर
सोडूनि तू जाऊ नको दूर सजनी
सोडूनि तू जाऊ नको दूर

झाली आपली भेट जराही
पाखरे हि कुजबुजली
प्रीतीचा हा स्पर्श पाहून
चांदणी हि लाजली

आयुष्याच्या वळणावरती
भेटला मला यार
कशी जाऊ सोडून मी दूर , सजना
कशी जाऊ सोडून मी दूर

जीव माझा तुझ्यात गुंतला
श्वास माझा अडखळला
येता शब्द तुझे जरासे
देह माझा डगमगला

आठवणीत तुझ्या ग राणी
पेटलं मन सार
सोडूनि तू जाऊ नको दूर सजनी
सोडूनि तू जाऊ नको दूर

1 thought on “Soduni Tu Javu Nako Dur G Sajani Lyrics-Love Song”

  1. Pingback: Dahi Dudh Loni Lyrics | PlayLyric.com

Leave a Comment

close