Tap Tap Takit Tapa Lyrics
टपटप टपटप टाकीत टापा चालत माझा घोडा
टपटप टपटप टाकीत टापा चालत माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा
उंच उभारी दोन्ही कान
ऐटीत वळवी अपुली मान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा
घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होतो स्वार
नुसता त्याला पुरे इशारा ,कशास चाबूक ओढा
घोडा माझा घाली रिंगण
उखडून टाकी सारे अंगण
काही त्याला अडवित नाही , नदी असो कि ओढा
सात अरण्ये , समुद्र सात
ओलांडीत हा एक दमात
आला आला माझा घोडा , आधी रस्ता सोडा
– शांता शेळके