Singer: Adarsh Shinde
Music: Amitraj
Lyrics: Kshitij Patwardhan
Ti Talwar Powada Lyrics in Marathi
सह्याद्रीच्या कडेकपारी
घुमतो वारा तुझ्या नामाचा
कृष्णा गोदा भीमा तापी
घागर भरती तुझ्या कृपेच्या
जिरं जिरं जी… जिरं जिरं जी…
जिरं जिरं जी हा..
आई फिरविते हात कपाळी
सांगे लेकराला तुझीच कथा
वाटे कडे बघ डोळे लागले
सांग भेटशील कधी रे आता
तुझी लेकरे रोज नव्याने
शोधत राहती तुझ्या खुणा
उद्धरून तू टाक आम्हाला
जन्माला तू ये रे पुन्हा
जिरं जिरं जी… जिरं जिरं जी…
जिरं जिरं जी हा..
पुन्हा तुझा आवाज ऐकण्या
पंच प्राण हे येतील का रे
डोळ्यांची हि निरांजने रे
औक्षण करती डोळे भरुनी
लक्ष टोपडी शिवली जातील
जर जर जर जर
माया भरल्या साड्यामधुनी
लाख कड्यांना आकार येईल
पोलादाच्या खांबामधुनी
पायी वाळा तुला घालतील
आगीतून दावून सुलाखुनी
तीट लावण्या काजळ देईल
रयत हि अंधाराची घेऊन
असा हवा जी, बाल शिवाजी
मुलखाचा होईल कणा
उद्धरून तू टाक आम्हाला
जन्माला तू ये रे पुन्हा
जिरं जिरं जी… जिरं जिरं जी…
जिरं जिरं जी हा..
पाठीशी असतील मावळे
अंगावर घेशील वादळे
कधी गडावर कधी खिंडीतून
शौर्याचे मग रोज सोहळे
तुटलेल्या साऱ्या सांध्यांना
पुन्हा एकदा जोडशील तू
अरे लाख असुदे अफजल आता
वाघ नखाविना फाडशील तू
पण कारस्थान शिजतील
डाव आखले जातील
तुला पाडण्या सारे शत्रू एकवटतील
संकटाचे वादळ येईल
आभाळाचा अग्नी होईल
डोळ्या देखत तांडव सारे
तू एकटा कसे रोखशील
धावून येई मग ती शक्ती
जिच्यावरी अखंड भक्ती
उघडून दिव्यत्वाचे दार
आई भवानी घे अवतार
घे अवतार, घे अवतार
आई भवानी घे अवतार
हात पसरतो आई भवानी
बळ द्यावे अपरंपार
शिवबा लढतो प्राणपणाने
हाती देई ती तलवार
ती दुमदुमणारा एक हुंकार
जिरं जिरं जी… जिरं जिरं जी…
ती वज्राची रे लख्ख किनार
जिरं जिरं जी… जिरं जिरं जी…
ती चैतन्याचा साक्षात्कार
तू आन पुन्हा रे ती तलवार
तू आन पुन्हा रे ती तलवार
तू आन पुन्हा रे ती तलवार
1 thought on “Ti Talwar Powada Lyrics-Shreyas Talpade”