UGHAD DAYECH DAAR LYRICS-HIT KOLI GEET 2019

  • गीत संगीत-अशोक हिरामण अभंगे,
  • विशाल अभंगे ,
  • गायक-प्रज्ञा अभंगे, महेंद्र पाटील
  • संगीत संयोजन-स्वराधीश स्टुडिओ सानपाडा आणि S A hertz स्टुडिओ पेण

UGHAD DAYECH DAAR LYRICS in Marathi

आई गो आई तुला भेटाया आयलो
उघड दयेच दार आई उघड दयेच दार

एकविरा माउली कृपेची सावली
भक्तांना देशीया धाव
आई गो आई तुला भेटाया आयलो
उघड दयेच दार आई उघड दयेच दार

कामा धंद्यातून सवड काढून
आलो तुझ्या दरबारी
फुल हार वाहींन आरती गाईन
पूजेची करून तयारी
तुझ्याच पायी करून घे आई
तुझ्या नावाचा जयजयकार
आई गो आई तुला भेटाया आयलो
उघड दयेच दार आई उघड दयेच दार

दर्शनासाठी बघ तळमळतोय
हा भक्तांचा तांडा
कार्लेच्या डोंगरावरी फडकतो
आई माऊलीचा झेंडा
समजून घे मज आशीर्वाद दे
घडू दे साक्षात्कार आई
आई गो आई तुला भेटाया आयलो
उघड दयेच दार आई उघड दयेच दार

तुझा महिमा ऐकून आलो
तुझ्या पायाचा चाकर झालो
तुझ्या भक्तीच अमृत प्यालो
तुझी पालखी घेऊन निघालो
कोंबऱ्या बकऱ्याचा मान ह्यो देईन
कर माझा उद्धार आई
आई गो आई तुला भेटाया आयलो
उघड दयेच दार आई उघड दयेच दार

एकविरा माउली कृपेची सावली
भक्तांना देशीया धाव
आई गो आई तुला भेटाया आयलो
उघड दयेच दार आई उघड दयेच दार

Leave a Comment

close