Vitthalachya Nami Ranguniya Jau Lyrics-Suryakant Shinde

Vitthalachya Nami Ranguniya Jau Lyrics in Marathi

विठ्ठलाच्या नामी रंगुनिया जाऊ
विठ्ठलाच्या नामी रंगुनिया जाऊ
विठू माउलीचे गुण चला गाऊ
विठू माउलीचे गुण चला गाऊ

नाम घेता विठ्ठलाचे उद्धार होई
मनातील चिंता हारूनिया जाई
अंतरात ज्योत श्रद्धेची लावू
विठ्ठलाच्या नामी रंगुनिया जाऊ

अमृताची गोडी तुझ्या भजनात
उध्दारीती संत पहा बहू गुण गात
चंद्रभागेत आपण चला सारे न्हाऊ
विठ्ठलाच्या नामी रंगुनिया जाऊ

माऊलीच्या चरणी जेव्हा कर जुळती
जन्मो जन्मीची पापे क्षणात जळती
त्या मोहमायेला निरांजली देऊ
विठ्ठलाच्या नामी रंगुनिया जाऊ

कैवल्याचा पुतळा विठू लेकुरवाला
बालपणासंगे वारकरी मेळा
परब्रह्म ते याची डोळ्यांनी पाहू
विठ्ठलाच्या नामी रंगुनिया जाऊ

Leave a Comment

close