Yeshil Na Lyrics
आठव तुझी, दाटे मनी
हूरहूर ती, हृदयातही
डोळे तुझ्या, वाटेवरी
येशील ना, शिणले जरी..
स्मरते मला अजुनि,
भेट आपुली,
भेट कोवळी ती,
पावसातली…
अंग अंग चिंब ओले,
जीव धुंदले,
धडधड उरात दोन्ही,
श्वास रोखुनि..
तू श्वास रे, होऊन जिवा
येशील ना, माझ्या उरी
डोळे तुझ्या, वाटेवरी
येशील ना, शिणले जरी
स्मरतो मला अजुनि,
तो चांदवा,
तो गारवाऽ अन्
तो मारवा..
शिंपूनिया सडा जो,
होई बावरा
प्राजक्त कोवळा काऽ,
स्मरतो तुला?
वा-यासवे, गंधाळुनी..
देशील का, संजीवनी..
डोळे तुझ्या, वाटेवरी
येशील ना, शिणले जरी…
Also See: Tu Ashi Ye Kadhi Lyrics